अनुभव कार्टून विश्वातला !!!!!
बरेच दिवसांनी आज काहीतरी लिहावं असं वाटतंय. “बोलके सूर” हा माझा ब्लॉग सुरु तर केला मी, पण सातत्य राखू शकलो नाही लिहिण्यात. मधल्या काळात इतक्या घडामोडी घडल्या की, साधी आठवण सुद्धा राहिली नाही ब्लॉग लिहिण्याची. काल एका बुक स्टॉल वर “सप्तसूर माझे” हे अशोक पत्की काकांचं आत्मचरित्र दिसलं, त्वरित विकत घेतलं आणि क्षणार्धात पहिली ३० पानं वाचून झाली पण. ती वाचताना मनात आलं की आपण या संगीत क्षेत्रात काम करत असताना येणारे अनमोल अनुभव कुठे तरी जतन करून ठेवायला हवेत, आपल्या उत्तर काळात या आठवणी आपल्या चांगल्या सोबती ठरू शकतील, आणि हा काळ सरला तरी याचं अस्तित्व या आठवणींच्या रूपात साठून राहील. ही प्रेरणा घेऊन पुन्हा बोलके सूर ची नवीन इनिंग सुरु करतोय. आजचा अनुभव अप्रतिम तर आहेच पण माझ्यासारख्या गायक कलाकाराला खूप काही देऊन जाणारा आहे. निमित्त Disney चा एक Animation पट, ज्याचं हिंदी भाषांतर केलेला चित्रपट. ...