पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठीत शिक्षण : वर्तमान आणि भविष्यातील आव्हान

इमेज
प्राथमिक शालेय शिक्षण – लोकमान्य प्राथमिक विद्यालय, मुलुंड पूर्व. माध्यमिक शालेय शिक्षण – वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय, मुलुंड पूर्व व                        कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल कल्याण पश्चिम. हे लिहिताना आज सुद्धा इतकं छान वाटतंय, की तीनही शाळा आठवताहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत असताना केलेला अभ्यास, परीक्षा, तिमाही, सहामाही, वार्षिक, प्रगती पुस्तक, प्रार्थना, पी.टी. , मधली सुट्टी एक ना अनेक.....हे सगळं आठवतंय. किती संस्कार केलेत मराठी शाळांनी आजवर. किती ग्रेट माणसं घडवलीयेत; याची ददात नाही. पण हीच मराठी शाळा आज धडपडतेय तिच्या अस्तित्वासाठी. विदारक परिस्थिती आहे मराठी शाळेची आणि मराठीतून शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांची. मी मराठी शाळेत शिकलो. त्यानंतर कॉलेज मध्ये गेलो तर इंग्लिश ची थोडी बोंब होती, पण हळू हळू इतरांबरोबर राहून, बोलून, यायला लागली ती पण भाषा. अगदी त्या भाषेत परीक्षा देवून चांगले मार्क्स मिळतील इतपत. तिथून अभियांत्रिकीला गेल्याव...