पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सारे सूरों का है ये ही मिलन.....

इमेज
शाळेत असताना टीव्ही वर एक कार्यक्रम लागायचा , "TVS सारेगामा " !! एक सुंदर गाणारा व गोड दिसणारा तरुण गायक सूत्रसंचालन करायचा. त्याचं नाव "सोनू निगम" !!  एपिसोडची सुरुवात एखाद्या गोड गाण्याने व्हायची , आणि पुढच्या तासाभरात छान स्पर्धा अनुभवायला मिळायची. तेव्हापासूनच या कार्यक्रमात मला गाण्याची असीम इच्छा होती. त्याकाळी कॅसेट चा जमाना होता. ऑडिशन साठी गाणं गाऊन पाठवायचं होतं. कसंबसं करून गाणं रेकॉर्ड करण्यासाठी, बाबांच्या ओळखीने एक स्टुडिओ मिळाला. डिअर स्टुडिओ. तिथे गेलो आणि माझं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं - "कुछ ना कहो ",  लकीली मला लताबाईंनी गायलेला ट्रॅक मिळाला , खूप सही वाटलं. कॅसेट तर झाली पण आता पाठवायची कशी ? तेव्हा Courier सर्विस इतकी सहज उपलब्ध नसायची आणि महाग पण खूप असायची. मग पोस्टाने पाठवायची कॅसेट, असं ठरवलं. पण कदाचित ती पोहोचलीच नाही , खूप वाट पाहिली , ना कॉल आला ना बोलावणं. साल १९९९. सा ल २००३ सारेगामा मध्ये जायचं स्वप्न ताजं होतं. कॉलेजचे रंगीन दिवस सुरु झाले होते आणि एके दिवशी खबर लागली की ऑडिशन्स आहेत मुंबईत , मी लागलीच त...

सोनू निगम - एक अनभिषिक्त "दैवी" सूर

इमेज
“सोनू निगम” या आवाजाची भूरळ पडलेल्या काही वेड्या लोकांमध्ये कदाचित माझा नंबर खूप वरचा असेल. कॉलेज मध्ये मला दर वेळेस गाणं गाण्याआधी सांगितलं जायचं - "बाबा रे ते जिंदगी मौत ना बन जाये - कृपया नको गाउस" कारण ते माझं जीवश्च कंठश्च आहे. त्यानंतर मी 'मेरा रंग दे बसंती चोला' गाऊ लागलो. मला आठवतंय हिंदी सारेगम च्या राष्ट्रीय निवड समिती समोर सुद्धा मी तेच गायलं आणि सारेगम मध्ये प्रवेश मिळाला. हो…. सोनू सरांवरचं हे निस्सीम प्रेम सुरु झालं, अगदी माझ्या लहानपणी जेव्हा ते 'सारेगम' होस्ट करायचे. तरुणाई नुसती भारावून गेली होती. 'संदेसे आते है',  'ऐसा लगता  है' (रेफ्युजी ), 'ये दिल दिवाना' अशी एकाहून एक गाणी हिट झाली होती. सगळ्यात कहर म्हणजे "दिवाना" आल्बम. ओहो - अगदी आजही त्यातली गाणी, सगळीच ऐकली जातात. सोनू निगम या आवाजाचा दबदबा उत्तरोत्तर वाढत गेला. अतिशय टॅलेंटेड अशा या गायकाने आदर्श घालून दिला की सुगम संगीतात आपली शैली निर्माण करणं म्हणजे काय असतं.. त्यांच्या स्ट्रगलच्या  काळातले खूप किस्से ऐकलेत. “मेहेनतीला पर्य...

कलाकारांचं आर्थिक नियोजन

इमेज
आम्हा कलाकारांना एक स्पेशल गोष्ट नेहेमी अनुभवायला मिळते - ती  म्हणजे खूप वेगवेगळ्या विषयांचे कार्यक्रम करायला मिळतात. आणि अशा स्पेशल ठिकाणी काही एक्सपर्ट माणसं भेटतात ज्यांचे विचार ऐकून प्रेरणा मिळते. "धन करा रे प्रसन्न" नामक एका कार्यक्रमात मला "आर्थिक गुंतवणूक" या विषयावरचे मोलाचे विचार, काही तज्ञ मंडळींकडून ऐकायला मिळाले. त्यातून मला एक कलाकार म्हणून आर्थिक साक्षरता व आर्थिक गुंतवणूक किती महत्वाची आहे याचा बोध झाला. कला विश्वात “आर्थिक” असा शब्द म्हटला की खूप चर्चा / वाद / तक्रारी यांना उधाण येतं, आणि कुणालाच त्याबद्दल फार ज्ञान अवगत नसतं, म्हणून मला जे ज्ञान मिळालय ते शेअर करावंसं वाटतंय, आता या विषयात मी काही तज्ज्ञ नाही, पण सामान्य भाषेत व सोप्या शब्दात काही मुद्दे मांडू इच्छितोय. पहिला मुद्दा - कलाकारांना निवृत्तीवेतन नसतं त्यामुळे त्यांच्या उतरत्या काळात त्यांच्या आर्थिक मदतीसाठी त्यांना स्वतःलाच धडपड करावी लागते. त्यामुळे आत्तापासून म्हणजे कार्यरत असतानाच भविष्याची तरतूद करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. म्हणजे काय ? तर आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक म...

ध्वनिमुद्रणाची अद्भुत दुनिया !!!!!

इमेज
सुरांच्या दुनियेत , अद्भुत गोष्टी घडतच असतात . अगदी कायम . आणि त्यांना काही सुमार नसतो कारण ते विश्वच अद्भुत असतं . जुन्या जमान्यात तर असे अनेक अद्भुत सुराविष्कार घडलेत , ज्यांची प्रचिती आजही आपल्याला त्या सोनेरी काळाचं संगीत ऐकताना येते . म्हणजे काय ? का - प्रत्येक वेळी,   जुनी गाणी ऐकल्यावर आपल्याला मस्त वाटतं ? का  - त्या गाण्यांचा आपल्यावर दूरगामी परिणाम होतो ? मला अनेकदा लोक विचारतात की असं काय आहे त्या गाण्यांमध्ये,   जे नेहेमी भावतं - आवडतं - लक्षात रहातं ? याचं उत्तर सोप्पं आहे . तो काळ विलक्षण शांततेचा होता . लोकांमध्ये ऊर्जा होतीच पण लोक शांत होती , समाधानी होती . आणि म्हणून त्यांनी केलेली प्रत्येक कलाकृती आपल्याला समाधान देऊ शकते अगदी आजही , कित्येक वर्षांनंतर सुद्धा . अजून एक गोष्ट जी त्या काळाकडे होती ती म्हणजे अत्यल्प तंत्रज्ञान . आणि त्यामुळे संगीत क्षेत्राचा पाया माणसांच्या कलेने आणि चिकाटीने रचला गेला . कशाबद्दल बोलतोय मी ?...

“God–Mother” 

इमेज
आज   मी  " वैशाली सामंत " या माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या  "Turning Point"   बद्दल बोलणार आहे . मला ठाऊक आहे की तुमच्यापैकी जवळ जवळ   सगळ्यांना माझी स्टोरी माहीत असेल . पण नसली तर इथे ती पुन्हा सांगणे क्रमप्राप्त आहे . दुबईत मध्ये २००४ मध्ये मी नोकरी करीता पोहोचलो , २००९ पर्यंत उत्तम नोकरी सुरु होती . एक साधा मराठी मुलगा ते दुबईत स्थायिक मराठी मुलगा इतका प्रवास झालेला होता . तिथे विकेंड ला गाणं सुरु होतच , शास्त्रीय संगीत शिक्षणही सुरु होतं . माझ्या दुबईतल्या जडणघडणीत एक मोठा वाटा दुबई महाराष्ट्र मंडळाचा सुद्धा आहे . २००८ मध्ये मी मंडळाच्या कार्यकारिणीवर होतो आणि खूप छान कार्यक्रम त्यावर्षी आम्ही केले . त्यातलाच शेवटचा होता " वैशाली सामंत कॉन्सर्ट " आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो . नेमका कामानिमित्त बाहेर असल्याने एका महत्वाच्या मीटिंग ला मी नव्हतो तेव्हा एक चर्चा झाली . काही कारणाने वैशाली सोबत येणारा गायक येऊ शक...