पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आरोग्यम धन संपदा !!!!!

आपल्याकडे चांगले आरोग्य नसेल तर आपण करत असलेल्या मेहेनतीचा काय फायदा?  आपली बायका-मुलांना एक चांगलं भविष्य द्यायचं असेल तर, फक्त मेहेनत आणि काम करून चालणार नाहीये, तब्येतीकडे लक्ष दिलंच पाहिजे. आणि वेळोवेळी टेस्ट्स करून व्यवस्थित उपचार करून घेतले पाहिजेत.  आपल्या समाजात, आपल्याला असलेल्या एखाद्या शारीरिक आजाराबद्दल "लाज वाटणे" हा खूप कॉमन विषय असतो. आजकाल तरुण मुलामुलींना बी पी, शुगर, स्पॉण्डिलायटिस वगैरे आजार जडू लागलेत, कारण बैठी जीवनशैली, व्यायामाचा आळस, चुकीचे खानपान आणि झोप नीट न घेणे.  आपण म्हणतो की सध्या भारतात तरुण लोकसंख्या जास्त आहे, पण त्याचप्रमाणे हृदयविकाराने अकस्मात जाणाऱ्यांमध्ये पण दुर्दैवाने तरुणचं आहेत. हे भीषण आहे.   आम्हा कलाकारांमध्ये तर ह्या गोष्टीचा फारच विदारक अनुभव दर काही महिन्यांनी समोर येत असतो. आणि मनात विचार येतो की करायचं काय? सामान्यतः कलाकारांमध्ये २-३ प्रकार आहेत. गायक, वादक, अभिनेते - अभिनेत्री वगैरे. सगळ्यांना आपापल्या कामात प्रचंड स्ट्रेस असतो. पण माझ्या पाहण्यात सर्वात जास्त स्ट्रेस हा वादकांना हो...

सूर नवा ध्यास नवा !!!!

इमेज
आयुष्यातले काही क्षण कधीच संपू नयेत असं वाटत राहतं, ८ वर्षांनंतर टीव्ही वर मिळालेली गाण्याची संधीही  फक्त अशीच होती. आणि स्वतःशी केलेल्या या स्पर्धेचा विजेता आपणच ठरल्यानंतर होणारा आनंद व मिळणारं समाधान याला कशाचीच तोड नाही. स्वतःशी स्पर्धा म्हणजे काय ? गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन वर काम करत असताना रिऍलिटी शो मधले माझे सहभाग, फारच निराशाजनक होते. स्पर्धेत गातोय म्हणून कॉन्शस होणे, त्यामुळे गाणं छान न उमटणे - डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू असायच्या , म्हणजे आपला ड्रेस काय आहे पासून ते, आज परीक्षकांना कसं खुश करता येईल आपल्या गाण्यातून इथपर्यंत. आणि आता इतक्या वर्षांनी हेच उमगलं की, आपण फक्त मिळालेलं गाणं १०० % गायचं असतं, आणि तितकंच आपल्या हातात असतं बस्स !!!!! जेव्हा या विचाराला मी अंगिकारू शकलो, तेव्हाच माझं सादरीकरण हे मार्क्स - परीक्षकांची मते - या सगळ्याच्या परे गेलं . निदान मला तरी त्या सगळ्याचा काहीच फरक पडेनासा झाला.  आपला धर्म काय? चांगलं गायचं आणि मनं  जिंकायची एवढंच !!!! आणि आयुष्यात एका गोष्टीची खूण  कायमची पटली - "गाणं मोठं असतं - आपण...