पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

“God–Mother” 

इमेज
आज   मी  " वैशाली सामंत " या माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या  "Turning Point"   बद्दल बोलणार आहे . मला ठाऊक आहे की तुमच्यापैकी जवळ जवळ   सगळ्यांना माझी स्टोरी माहीत असेल . पण नसली तर इथे ती पुन्हा सांगणे क्रमप्राप्त आहे . दुबईत मध्ये २००४ मध्ये मी नोकरी करीता पोहोचलो , २००९ पर्यंत उत्तम नोकरी सुरु होती . एक साधा मराठी मुलगा ते दुबईत स्थायिक मराठी मुलगा इतका प्रवास झालेला होता . तिथे विकेंड ला गाणं सुरु होतच , शास्त्रीय संगीत शिक्षणही सुरु होतं . माझ्या दुबईतल्या जडणघडणीत एक मोठा वाटा दुबई महाराष्ट्र मंडळाचा सुद्धा आहे . २००८ मध्ये मी मंडळाच्या कार्यकारिणीवर होतो आणि खूप छान कार्यक्रम त्यावर्षी आम्ही केले . त्यातलाच शेवटचा होता " वैशाली सामंत कॉन्सर्ट " आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो . नेमका कामानिमित्त बाहेर असल्याने एका महत्वाच्या मीटिंग ला मी नव्हतो तेव्हा एक चर्चा झाली . काही कारणाने वैशाली सोबत येणारा गायक येऊ शक...

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

इमेज
संगीताच्या प्रवासात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. त्या घडेपर्यंत आपला विश्वास बसत नाही, पण त्या घडत असतानाचा अनुभव नितांत सुंदर असतो. एक दिवशी बायकोचा फोन आला, की अवधूत वाडकर (आजीवासान स्टुडिओचा प्रमुख ध्वनिमुद्रक व सुरेशजी वाडकरांचा पुतण्या ) तुला शोधतोय. एकदा त्याला कॉल कर. आता वास्तविक अवधूतचा मला कॉल यावा ही नेहेमीतली गोष्ट नव्हती. मी त्याला फोन केला तेव्हा त्याने मला सांगितलं की श्रेयाजींचे मॅनेजर  श्री. भरतभाई एक गायक शोधत आहेत, श्रेयाजींच्या शोज साठी. तू त्यांना फोन करशील का? मी त्यांना तुझं नाव सजेस्ट केलंय. हे ऐकल्यावर एक मिनिट विश्वास बसेना, कारण माझा प्रिय मित्र ह्रिषीकेश रानडे  श्रेयाजींसोबत असतो हे मला चांगलं ठाऊक होतं, कित्येक वेळा ह्रिषीशी बोलताना आम्ही त्याबद्दल बोलत असू. असो, मी विचार केला आणि लागलीच भरतभाईंना फोन केला. अत्यंत प्रोफेशनल असतात ना, तसा भारदस्त आवाज ऐकू आला. त्यांनी मला भेटायला बोलावलं आजीवासन मधेच. आणि दुसऱ्या दिवशी मी पोहोचलो. ६ फूट उंचीचे साठीचे एक तेजस्वी, पण मृदू गृहस्थ भेटले. म्हणजे भरतभाई. अगदी ५ मिनटात त्यांनी मला सग...

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

इमेज
"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया" दुबई:   शेख रशीद ऑडिटोरियम . महाराष्ट्र मंडळ दुबई चा कार्यक्रम . सारेगमप लिटल चॅम्प चे ५ लिटल वंडर्स . आणि त्यांचा दादा - कमलेश दादा . पहिली भेट झाली आमची, तेव्हा कमलेश दादाचं   नाव मी खूप ऐकून होतो . सारेगमप तर आहेच , पण माझा रूम मेट - पराग साठे कडून , खूपदा ऐकलं होता  " कमलेश दादा" या रसायनाबद्दल . भेट झाली तेव्हा खूपच सिरियस वाटला दादा . म्हणजे तो आहेच . असतोच . त्याच्या कामाला घेऊन तो खूप Focused असतो नेहेमी . कोल्हापुरात एक कॉन्सर्ट होणार होतं जिथे मला वैशाली सामंत सोबत गायचं होतं , आणि तिनेच मला " कमलेशला भेट " म्हणून सांगितलं होतं . खूप बोललो नाही आम्ही , पण थोडक्या शब्दात ओळख झाली आणि दादाने मला कोल्हापुरात काय काय गायचं ते सांगितलं . कट टू   - कोल्हापूर - स्टार प्रवाह चॅनेल चं   कॉन्सर्ट होतं - वैशाली सामंत कॉन्सर्ट , मी दुबईहून कोल्हापुरात पोचलो सकाळी ६ वाजता आणि हॉटेल च्या लॉबीत क...