पोस्ट्स

सप्टेंबर, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केमॉन बोका मोंटा रे......

इमेज
हल्ली एखादी हिंदी फिल्मच्या गाण्यांची अख्खी सी डी विकत घेण्याचा योग फारच कमी येतो. कारण तसं संगीत बनत नाही आजकाल. काल एक सी डी शेल्फ मधून बघत होती माझ्याकडे, ज्यातली गाणी खूप वेळा मी ऐकली होती आणि आवडली पण होती मला. मी ती सी डी विकत घेतली. “लुटेरा” हल्लीच येऊन  गेलेला एक चित्रपट. सोनाक्षी सिन्हा चा एकमेव मी पाहिलेला आणि मला आवडलेला सिनेमा.     पिरियड फिल्म असल्याने संगीत आव्हानात्मक होतं याचं. पण याची जबाबदारी लीलया पेलली “अमित त्रिवेदी” या आत्ताच्या एका गुणी संगीतकाराने. Long Drive ला जाताना चांगली सी डी ऐकण्यासारखं सुख नाही. आपण, आणि ते संगीत बस. लुटेरा ची सी डी लावली गाडीत आणि इतकी मजा आली मला ती ऐकताना की भानच राहिलं नाही कधी माझं Destination आलं, आणि एव्हाना मी ४ वेळा ऐकून झाली होती सी डी. अगदी पहिल्या “सवार लू” पासूनच मनावर मोहिनी घातली सी डी ने. मोनाली ठाकूर चा  फ्रेश आवाज – अमिताभ भट्टाचार्य यांचे अप्रतिम शब्द लाभलेत या अल्बमला, खूप दिवसांनी चांगलं संगीत विथ चांगले शब्द ऐकायला मिळाले. दुसरं  गाणं “अनकही” – ते पण खूप अप्रतिम झ...

“परवरदिगार”

इमेज
“श्वासात सूर ताजे, हृदयात ताल वाजे यश कीर्ती ही क्षणाची, विद्या कधी न लाजे उपकार मायबापा, वरदान हे प्रभूचे हे रत्न संगीताचे, कंठी सदा विराजे होवोन मुक्त, उधळेन मी, ही सुरासुरांची नाणी..परवरदिगार परवरदिगार !!!!!!” स्वानंद किरकिरे यांचे हे शब्द, कौशल दादाचं आर्त संगीत आणि शंकर महादेवन यांचा थेट भिडणारा सूर असा अप्रतिम मिलाफ असलेलं हे गाणं जेव्हा पहिल्यांदा गायलो तेव्हा आत काहीतरी हललं. “कौशलकट्टा” कार्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाचं औचित्य होतं, आणि प्रथमच मी हे गीत गाणार होतो. या गीताच्या सुरुवातीला आनंद भाटे यांचा दैवी आवाज आपल्याला ऐकू येतो, त्यांनी बालगंधर्वांचं एक पद “दया छाया घे निवारुनिया” म्हटलंय आणि मग कौशल दादा ने गाणं परवरदिगार कडे नेलंय. सिनेमा पाहिलेला असल्याने माझ्या डोळ्यांसमोर सीन उभा होता, बालगंधर्व -  भोरच्या राजेसाहेबांकडून मिळालेली शाल, पुण्याच्या वाटेवर एका दर्ग्यावर वाहतात, आणि फकिराला पैसे दान देतात, तिथून ही कव्वाली सुरु होते. गाण्याच्या ओरिजिनल ट्रॅक वर मला गायचं असल्याने अगदी सिनेमासाठीच मी गातोय असं मनात वाटत होतं. भीती होती मनात. गाणं त...

सुरांना मिळालेली सोनेरी संधी

इमेज
अवघ्या महाराष्ट्रातली ११ शहरं, ४२ शाळा, आणि २५००० हून जास्त मुलांसोबत मिळालेले सोनेरी क्षण. मला खुपच भाग्यवान असल्यासारखं वाटलं त्या क्षणी जेव्हा “ लोकमत ” वृत्तपत्र संस्थेने मला त्यांच्या “ बाल विकास मंच ” साठी बोलावलं. एक गायक म्हणून अशी संधी मिळणं हे खुपच अलौकिक होतं. माझ्यासोबत माझी गायिका मैत्रीण डॉ. नेहा वर्मा होती, आणि तिच्यासोबत काम करताना या सर्व ठिकाणांना भेट देताना, मुलांसाठी ऑटोग्राफ देताना खरच खूप मज्जा वाटली. सगळ्या शाळांमधल्या मुलांना सांगण्यात आलेलं होतं की, मी आणि नेहा येणारोत, तेव्हा त्यांच्यातला उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. शाळांच्या हॉल मध्ये आम्ही शिरताच चेहऱ्यावर हसू + आश्चर्य + उत्साह मिश्रित भाव, आणि टाळ्या वाजवून आमचं स्वागत केलं जात होतं. एक विलक्षण आनंद होता मनात त्या क्षणी. त्याहून जास्त आनंद त्या सर्वांसाठी गाताना आणि त्यांना मंचावर बोलावून गाणी सादर करायला सांगताना होत होता. त्या सर्व मुला-मुलींच्या डोळ्यांमध्ये एक विशिष्ट चमक होती. आपण ज्यांना टी. व्ही. वर पाहतो असे जयदीप दादा आणि नेहा ताई आपल्याला भेटायला खास आलेत याचा खूप आनंद वाटत होता त्...

आरास ही सज्ज झाली तुझ्या दर्शना.....

इमेज
प्रिय बाप्पा, तू येतोस. वाजत गाजत. आशीर्वाद देतोस. पाहुणचार घेतोस. आणि पुन्हा आपल्या गावी निघून जातोस. पण आम्ही मागे असलेले सगळे तुझ्या आगमनाची पुन्हा किती आतुरतेने वाट पाहत असतो ते तर तुला माहित आहेच. प्रत्येक वेळेस, सुरुवात करताना तुझं नाव घेऊनच पुढे जातो. तू येणार म्हणून खूप तयारी करतो, तुझी वाट पाहतो. तुझ्यासाठी खरेदी करतो खूप साऱ्या वस्तू. तुझ्या आवडीचे पदार्थ बनवतो, मिठाई आणतो. तुझं येणं आम्ही खूप सेलिब्रेट करतो रे बाप्पा. तुझ्या येण्याने मिळते एक उर्जा, जगण्याची नवी उमेद, नवीन काम सुरु करण्याचं बळ. एक आत्मविश्वास. इतकी वर्ष तुझ्या आशीर्वादाने सगळं कसं छान चाललय, हे पाहायला तू नित्य नेमाने इथे असतोस. तुझा उत्सव संपला तरी इथेच रेंगाळतोस तू माहितिये मला. गेलं वर्ष अख्खं डोळ्यांसमोरून जातंय - तू पुन्हा येतोयस आज,  आनंद वाटतोय. या वेळेस माझ्या काही खास मागण्या आहेत तुझ्याकडे. घाबरू नकोस, संप नाही करणार मी. तुझी पूजा अर्चा तुला हवी तशीच करेन. फक्त त्या मागण्या मान्य कर आणि त्यांची पूर्तता होऊ देत. माझ्या देशबांधवांना सद्बुध्दी आणि सद्सद्विवेक बुध्दी दे, त्यांना मत...

अनुभूती.....सुरांची !!!!!

इमेज
परवा माझ्या फोनवर मेसेज आला - "उद्या सकाळी आहेस का ? ठाण्याला रेकॉर्डिंग आहे , " पितृऋण" सिनेमाच्या पार्श्वसंगीतासाठी ( Background Score)" मी लागलीच हो म्हटलं , सकाळी १०.३० ची वेळ सांगितली होती. स्टुडीओ होता ऑडीओ-आर्टस , माझा मित्र आदित्य ओक याचा अतिशय अद्ययावत असा स्टुडीओ.   " पितृऋण" या सिनेमाचं ट्रेलर मी नुकतच पाहिलं होतं , नितीश भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेला , सचिन खेडेकर , सुहास जोशी आणि तनुजा जी असे मातब्बर कलाकार , कौशल दादाचं संगीत व पार्श्वसंगीत, सगळं मस्त जमून आलेलं , मला ट्रेलर ही आवडलं , पण माहित नव्हतं की याच सिनेमा साठी मला गायला बोलावलं जाईल.   स्टुडीओत काम सुरु झालं , आणि पहिल्यांदाच आयुष्यात, चित्रित झालेला सीन स्क्रीन वर पाहून, त्यावर कौशल दादा सुचवत होता, त्याप्रमाणे आलाप गायचा होता. मला प्रसंग समजावून सांगण्यात आला आणि सीन प्रमाणे मी गायलो.   पहिला , दुसरा आणि शेवटचा आलाप सिनेमाच्या शेवटच्या फ्रेम वर संपला. एक कलाकार म्हणून इतकं भरून आलं मला की , या सिनेमाच्या ३ महत्वाच्या प्रसंगांवर माझ्या आवाजाचा साज चढवण्यात आल...
“बोलके सूर” - या माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉग वरची ही पहिलीच पोस्ट.....संगीताच्या स्वरमयी प्रवासात रोज येणाऱ्या सुरेल अनुभवांचा ठेवा जतन करून ठेवावा असं वाटून गेलं मनाला. शिक्षणाने इंजिनिअर असूनही सुरांच्या दुनियेतली माझी मुशाफिरी ४ वर्षांपूर्वी सुरु झाली. या काळात मला खूप गुणी संगीतकार, गीतकार, गायक, गायिका, दिग्दर्शक, लेखक अशी अनेक मंडळी भेटली. त्यांच्याकडून नेहमी काहीतरी शिकावं, असं वाटत राहिलं, या सगळ्या अनुभवातून प्रवास करताना नवनवीन प्रयोगांमध्ये सहभागीही होता आलं, त्यातूनच पार्श्वगायनाची संधी मला मिळत गेली. आणि मग या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गायन प्रकारांशी माझी ओळख होत गेली. जिंगल्स, नाटकातली गाणी, फिल्म मधली गाणी, अल्बम....आणि आता सिनेमासाठी केलेलं पार्श्वगायन... येणारा प्रत्येक अनुभव शब्दांकित करण्याचा प्रयत्न आहे. बोलके सूर – A New Journey Has Begun…….