आठवणी अमेरिकेच्या !!!!! - भाग १
डेस्कटॉप वर इमेजेस बदलत असताना एक फोल्डर सापडलं, या वर्षी (2014) झालेल्या आमच्या GRAND USA टूरचं. आणि आठवणींचा पूर आला एकदम. एकेक फोटोतून आठवत गेले ते ४६ दिवस अमेरिकेत नांदलेले. हो म्हणजे काय, "नांद्लो" आम्ही तिथे इतके दिवस. निमित्त होतं "कौशलकट्टा" हा कार्यक्रम, आणि तिथल्या मराठी मित्र मैत्रिणींना भेटून अगदी घरच्यासारखं फिलिंग आलं. New York - Connecticut - New Jersey - Philadelphia - Washington DC - Raleigh - Nashville - Atlanta - Houston - Phoenix - Los Angeles - San Francisco - Detroit & Minneapolis. असे एकूण १३ प्रयोग झाले. या सर्व शहरांतून फिरताना अमेरिकन संस्कृती, राहणीमान, जीवनशैली सगळं जवळून पाहायला मिळालं. अनुभव समृद्धता म्हणतात ती यालाच. या आधी पु. लं. चं, अपूर्वाई वाचलं होतं. आणि आता प्रत्यक्ष याची देही पाहिल्यावर मन प्रसन्न झालं. हवाच वेगळी आहे तिथली. हे फोटो पहा तुम्हांला लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. हे फोटोज आहेत प्रसिद्ध Times Square चे. अत्यंत उत्साहवर्धक जागा आहे ती. तिथली एनर्जी पाहून थक्क व्हायला होतं. तिथल...