पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुरेल आशीर्वाद !!!!!!!!

इमेज
लहानपणी बाबांनी मला एक कॅसेट आणून दिली, आणि म्हणाले, "बेटा ही ऐक आणि यातली गाणी बसव, तुला असं गाता आलं पाहिजे." कॅसेटचं नाव होतं - "सांज होता सखे"  गायक - सुरेश वाडकर गीतकार - सौमित्र      आणि     संगीतकार - अशोक पत्की.......... तेव्हा कळायचं काहीच नाही, पण कॅसेट ऐकली - वारंवार ऐकली, त्यातली गाणी आवडू लागली. सुरेशजींचे दैवी सूर, कवी सौमित्र यांची नितांत सुंदर शब्द योजना आणि पत्की काकांचं अलवार संगीत, असा सुरेख साज होता सगळा. मोठं होता होता कळू लागले या कॅसेट मधील गाण्यांचे अर्थ, त्या शब्दांना दिलेला पुरेपूर सांगीतिक न्याय. ती गाणी गायला लागलो तेव्हा ही मनाला खूप भिडल्या त्या चाली. हळू हळू अशोक पत्की या नावाची सांगीतिक जादू अनुभवत गेलो, आणि उराशी स्वप्न बाळगू लागलो की एक दिवस, पत्की काकांकडे गायला मिळू दे रे देवा......प्रबळ इच्छा....... गाणं शिकत असताना पत्की काकांच्या खूप चाली आमच्या गुरुजींनी शिकवल्या, त्या कार्यक्रमात सुद्धा सादर व्हायच्या, पण स्वप्न सत्यात उतरायला अजून बराच काळ जावा लागणार होता. कॉलेज नंतर, नोकरीच्या निमित्ताने दुबईला गेल...

सलाम किशोरदा !!!!!!

इमेज
किशोर कुमार - या नावात कसली उर्जा भरलीये !!!!!! त्यांचं गाणं लागलं ना की थांबतो आपण एक क्षण आणि मन घुटमळतं स्वतःशी....त्यांच्या आवाजापाशी.....कसला गोड आवाज??? - कधी मस्तीखोर - कधी करुण - कधी खटयाळ - कधी गंभीर, कित्ती शेड्स असाव्यात एका आवाजाला ? प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देऊन जातात त्यांची गाणी. मन भरतच नाही. ऐकताना, गाताना, गुणगुणताना. एखादा माणूस आणि त्याचा आवाज इतका कसा भरून राहू शकतो तो हयात नसताना ? अजब आहे !!!!! किशोरदा म्हणजे एक भन्नाट व्यक्तिमत्व - त्यांच्या बद्दल वाचावं तेवढं कमी - आणि ऐकावं तेवढं अजब !!!! "कलंदर किशोरकुमार" हे पुस्तक वाचनात आलं आणि या माणसाची कथा समजली. वाचून थक्क व्हायला होतं. रेडीओ वर अन्नू कपूर यांच्या 'सुहाना सफर' मध्ये रोज एक किस्सा किशोर कुमार यांचा असतो. ते ऐकून तर अजूनच कुतूहल निर्माण होतं. स्वत:च्या आयुष्यात खूप तणाव असूनही - माईक वर गेल्यावरती एका अतिशय वेगळ्या रूपात जगासमोर यायचं म्हणजे दैवी शक्तीच असली पाहिजे. किशोरकुमार एकदाच होतो जगात. पुन्हा होणे नाही. याची खात्री पटते. त्यांचं गाणं म्हणजे सळसळते चैतन्य. मला ने...

दिवाळी पहाट - एक सुरेल संस्कृती......

इमेज
दरवर्षी आपण सगळेच ज्या सणाची अगदी उत्सुकतेने वाट पाहत असतो ना, तो सण म्हणजे "दिवाळी".....अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये एक उत्साह आणि आनंद निर्माण होतो.....हे दरवर्षी जाणवतं. आम्हा कलाकार मंडळींमध्ये ही दिवाळीची खास उत्सुकता असते ती अजून एका कारणासाठी म्हणजे, "दिवाळी पहाट". दिवाळीच्या मंगल पहाटे, सगळे जण, नटून, सजून, फराळ करून किंवा बरोबर घेऊन, आपल्या जवळच्या नाट्यगृहात वा कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन - सुंदर संगीताची अनुभूती घेताना दिसतात. मनाला इतकं छान वाटतं की या सगळ्या मंडळींच्या घटकेभरच्या आनंदोत्सवात आम्ही सगळे कलाकार सामील होऊन त्यांचं मनोभावे मनोरंजन करू शकतो. केवढी मोठी गोष्ट आहे ही....एरवी सुद्धा कार्यक्रमातून गाताना मला लोकांच्या आवडीची गाणी सादर करताना, एक आनंद असतोच. दर्दी प्रेक्षक त्यांचं आवडतं गाणं आलं की, बेभान होऊन ते गाणं आमच्या सोबत गुणगुणतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मनातलं समाधान त्यांच्या टाळ्या बनून आमच्या पर्यंत पोहोचतं. दाद मिळते तेव्हा खूप छान वाटतं. आणि समोरचा रसिक प्रेक्षक आपलं गाणं किती मनापासून ऐकतोय याची ही...

आठवणी अमेरिकेच्या......भाग २ - एक हळवी पण प्रेरणादायी आठवण.

इमेज
एक हळवी पण प्रेरणादायी आठवण....... आज मी तुमची कुणाशी तरी ओळख करून देणार आहे. या जगात किती लोक, कितीतरी  वेगवेगळी समाजोपयोगी कामे करून सोशल सर्विस करत असतात. आपल्याला माहित सुद्धा नसतं बरेचदा. पण या लोकांना जवळून पाहिल्यावर कल्पना येते. त्यांचे उदात्त विचार आणि आपण समाजाला काहीतरी देणं लागतो ही भावना आपल्यात जागृत करते त्यांची उर्जा. मी बोलतोय न्यू जर्सीच्या श्री. महेश आणि मनीषा लाड यांच्याबद्दल. "Akhil Autism Foundation" ही आॅटीझम या आजार असणाऱ्या मुलामुलींसाठी, सेवाभावी काम करणारी एक अग्रगण्य संस्था, हे दाम्पत्य चालवते. खूप अभिमान वाटतो मला की, ही आपलीच मराठी माणसं परदेशात राहून इतकं मोठं सामाजिक काम हातात घेऊन कर्तृत्व गाजवताहेत. निमित्त हे की "कौशलकट्टा" हा कार्यक्रम संपूर्ण अमेरिकेत करण्याचा उद्देश म्हणजे "Akhil Autism Foundation" या संस्थेचा प्रचार करणे आणि लोकांना या संस्थेबद्दल जागृत करणे. आणि योगायोगाने, मी महेश आणि मनीषा यांच्याच घरी राहिलो बरेच दिवस. आणि मी जे पाहिलं त्याने मी आतून हललो. महेश आणि मनीषा यांचा गोड मुलगा अखिल - त्याला...

आठवणी अमेरिकेच्या !!!!! - भाग १

इमेज
डेस्कटॉप वर इमेजेस बदलत असताना एक फोल्डर सापडलं, या वर्षी (2014) झालेल्या आमच्या GRAND USA टूरचं. आणि आठवणींचा पूर आला एकदम. एकेक फोटोतून आठवत गेले ते ४६ दिवस अमेरिकेत नांदलेले. हो म्हणजे काय, "नांद्लो" आम्ही तिथे इतके दिवस. निमित्त होतं "कौशलकट्टा" हा कार्यक्रम, आणि तिथल्या मराठी मित्र मैत्रिणींना भेटून अगदी घरच्यासारखं फिलिंग आलं. New York  - Connecticut -  New Jersey -  Philadelphia - Washington DC - Raleigh - Nashville - Atlanta - Houston - Phoenix - Los Angeles - San Francisco -  Detroit &  Minneapolis. असे एकूण १३ प्रयोग झाले. या सर्व शहरांतून फिरताना अमेरिकन संस्कृती, राहणीमान, जीवनशैली सगळं जवळून पाहायला मिळालं. अनुभव समृद्धता म्हणतात ती यालाच. या आधी पु. लं. चं, अपूर्वाई वाचलं होतं. आणि आता प्रत्यक्ष याची देही पाहिल्यावर मन प्रसन्न झालं. हवाच वेगळी आहे तिथली. हे फोटो पहा तुम्हांला लक्षात येईल मी काय म्हणतोय ते.  हे फोटोज आहेत प्रसिद्ध Times Square चे. अत्यंत उत्साहवर्धक जागा आहे ती. तिथली एनर्जी पाहून थक्क व्हायला होतं. तिथल...

अनुभव कार्टून विश्वातला !!!!!

इमेज
                                                बरेच दिवसांनी आज काहीतरी लिहावं असं वाटतंय. “बोलके सूर” हा माझा ब्लॉग सुरु तर केला मी, पण सातत्य राखू शकलो नाही लिहिण्यात. मधल्या काळात इतक्या घडामोडी घडल्या की, साधी आठवण सुद्धा राहिली नाही ब्लॉग लिहिण्याची. काल एका बुक स्टॉल वर “सप्तसूर माझे” हे अशोक पत्की काकांचं आत्मचरित्र दिसलं, त्वरित विकत घेतलं आणि क्षणार्धात पहिली ३० पानं वाचून झाली पण. ती वाचताना मनात आलं की आपण या संगीत क्षेत्रात काम करत असताना येणारे अनमोल अनुभव कुठे तरी जतन करून ठेवायला हवेत, आपल्या उत्तर काळात या आठवणी आपल्या चांगल्या सोबती ठरू शकतील, आणि हा काळ सरला तरी याचं अस्तित्व या आठवणींच्या रूपात साठून राहील. ही प्रेरणा घेऊन पुन्हा बोलके सूर ची नवीन इनिंग सुरु करतोय. आजचा अनुभव अप्रतिम तर आहेच पण माझ्यासारख्या गायक कलाकाराला खूप काही देऊन जाणारा आहे. निमित्त Disney   चा एक Animation पट, ज्याचं हिंदी भाषांतर केलेला चित्रपट. ...