पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सूर निरागस हो !!!!!!!!

इमेज
"कट्यार काळजात घुसली" - एक संगीत परंपरा, अजरामर झालेली, दारव्हेकर मास्तरांच्या समृद्ध लेखणीतून उतरलेली. नाटक दुर्दैवाने पाहता आले नाही, पण सिनेमा पाहिला आणि कृतार्थ वाटलं. एक काल्पनिक कथा ३ कलाकारांची, कलाकारातल्या नम्रतेची, अहंकाराची आणि धाडसाची. हे शिवधनुष्य पेलणं खूपच कठीण होतं.... सुबोध भावे या आजच्या काळातल्या जाणत्या - जबाबदार - अभ्यासू - कलाकाराने हा विडा उचलला. आणि पुढे जे झालय ते आपण सगळे अनुभवतो आहोत आत्ता या क्षणी. सिनेमा भरभरून देतोय रसिकांना. आणि रसिक तृप्त होतायत. कट्यार चे संगीत हा तर तिचा आत्मा. ही जबाबदारी थेट पंडित अभिषेकी बुवांकडून शंकर महादेवन यांच्यावर सोपवलेली होती.....आणि त्यांनी सुद्धा पुरेपूर न्याय देत रसिकांना मंत्रमुग्ध केलं , त्यांच्या लोभस आवाजाने , अप्रतिम लयकारीने आणि अत्यंत रुचीसंपन्न संगीताने. शिवाय त्यांनी पंडितजी हे पात्र तितक्याच निर्मळतेने अभिनेता म्हणून सादर केलं. आजच्या काळातले पंडितच आहेत शंकर महादेवन सर. तुम्हाला शतश: नमन. येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी हे आदर्शवत कार्य तुम्ही करून ठेवल्याबद्दल. कट्यार मधील अजरामर गीता...

प्रेमकथेची जादू......

इमेज
सिक्वेल - भाग दुसरा  हा प्रकार आपल्याकडे फार क्वचितच चाललेला. पण जेव्हा मुंबई पुणे मुंबई या सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा सुरु झाली तेव्हा चाहत्यांनी एकच कल्लोळ माजवून दिला.   एखाद्या सिनेमाच्या मागे चाहत्यांचं इतकं प्रेम असावं ही खरं तर भाग्याची गोष्ट. पण त्या बरोबरच येते, एक जबाबदारी, त्याचा पुढचा भाग बनवताना. आणि प्रेक्षकांच्या उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचं Challenge सुद्धा.   मुंबई - पुणे - मुंबई  २  या सिनेमाने या सगळ्या अपेक्षांची पूर्तता केली. चित्रपट अत्यंत यशस्वीरीत्या सिनेमागृहात जोमाने चालू आहे, हीच त्याची पावती.   सिनेमा कसा बनतो ? त्याच्यामागे किती लोक, काय काय, कष्ट घेत असतात, याची आपल्याला सुतराम कल्पना नसते. मुंबई पुणे मुंबई २ बनत होता त्यावेळी आमच्या घरात त्याची लेखिका बसलेली असल्याने , सिनेमाची प्रोसेस मला फार जवळून पाहता आली. काय असते ही प्रोसेस ?  लेखक / लेखिका कथा लिहितात. दिग्दर्शक आणि लेखक मिळून त्याची पटकथा फायनल करतात. मग त्यावर संवाद लिहिले जातात. कथेनुरूप गाणी लिहिली जातात. ती गायली जाता...