सोनू निगम - एक अनभिषिक्त "दैवी" सूर
“सोनू निगम” या आवाजाची भूरळ पडलेल्या काही वेड्या लोकांमध्ये कदाचित माझा नंबर खूप वरचा असेल. कॉलेज मध्ये मला दर वेळेस गाणं गाण्याआधी सांगितलं जायचं - "बाबा रे ते जिंदगी मौत ना बन जाये - कृपया नको गाउस" कारण ते माझं जीवश्च कंठश्च आहे. त्यानंतर मी 'मेरा रंग दे बसंती चोला' गाऊ लागलो. मला आठवतंय हिंदी सारेगम च्या राष्ट्रीय निवड समिती समोर सुद्धा मी तेच गायलं आणि सारेगम मध्ये प्रवेश मिळाला. हो…. सोनू सरांवरचं हे निस्सीम प्रेम सुरु झालं, अगदी माझ्या लहानपणी जेव्हा ते 'सारेगम' होस्ट करायचे. तरुणाई नुसती भारावून गेली होती. 'संदेसे आते है', 'ऐसा लगता है' (रेफ्युजी ), 'ये दिल दिवाना' अशी एकाहून एक गाणी हिट झाली होती. सगळ्यात कहर म्हणजे "दिवाना" आल्बम. ओहो - अगदी आजही त्यातली गाणी, सगळीच ऐकली जातात. सोनू निगम या आवाजाचा दबदबा उत्तरोत्तर वाढत गेला. अतिशय टॅलेंटेड अशा या गायकाने आदर्श घालून दिला की सुगम संगीतात आपली शैली निर्माण करणं म्हणजे काय असतं.. त्यांच्या स्ट्रगलच्या काळातले खूप किस्से ऐकलेत. “मेहेनतीला पर्य...