२०१३...... दरवर्षी शेवटचा दिवस असतो ना वर्षातला, तेव्हा सरल्या वर्षातल्या गोष्टी आठवत राहतात. त्या दृष्टीने, २०१३ खुपच ठळक लक्षात राहील कारण काही मोठ्या गोष्टी घडल्या, खूप मोठी मौल्यवान माणसं आपल्यातून निघून गेली. काही मोठे बदल घडले, काही बदलांची चाहूल लागली, पर्सनली पण मी बर्याच गोष्टी या वर्षी अनुभवल्या, त्या जश्या जमल्या तश्या माझ्या या ब्लॉग मधून उलगडल्या. पण या सगळ्याचा गोषवारा म्हणजे हा आजचा ब्लॉग, शेवटचा या वर्षातला. चिपळूणच्या मराठी साहित्य संमेलनातल्या “अमृताचा वसा” कार्यक्रमापासून माझं हे वर्ष सुरु झालं, त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे मला “लोकमत” वृत्त-संस्थेने दिलेली संधी, “बाल विकास मंच” या त्यांच्या उपक्रमासाठी, त्यांनी माझी निवड करून मला शाळेतल्या मुलांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी दिली. अख्खा महाराष्ट्र फिरता आला याचं वेगळच अप्रूप वाटलं. लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकलो याचा आनंद झाला. अश्या संध्या वारं...