२०१३......
दरवर्षी शेवटचा दिवस असतो
ना वर्षातला, तेव्हा सरल्या वर्षातल्या गोष्टी आठवत राहतात. त्या दृष्टीने, २०१३
खुपच ठळक लक्षात राहील कारण काही मोठ्या गोष्टी घडल्या, खूप मोठी मौल्यवान माणसं
आपल्यातून निघून गेली. काही मोठे बदल घडले, काही बदलांची चाहूल लागली, पर्सनली पण
मी बर्याच गोष्टी या वर्षी अनुभवल्या, त्या जश्या जमल्या तश्या माझ्या या ब्लॉग
मधून उलगडल्या. पण या सगळ्याचा गोषवारा म्हणजे हा आजचा ब्लॉग, शेवटचा या वर्षातला.
चिपळूणच्या मराठी साहित्य
संमेलनातल्या “अमृताचा वसा” कार्यक्रमापासून माझं हे वर्ष सुरु झालं, त्यानंतर
सर्वात महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे मला “लोकमत” वृत्त-संस्थेने दिलेली
संधी, “बाल विकास मंच” या त्यांच्या उपक्रमासाठी, त्यांनी माझी निवड करून
मला शाळेतल्या मुलांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी दिली. अख्खा महाराष्ट्र फिरता
आला याचं वेगळच अप्रूप वाटलं. लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकलो याचा आनंद
झाला. अश्या संध्या वारंवार मिळत नाहीत याची जाणीव झाली.
आपल्या सर्वांचा लाडका “सचिन”
निवृत्त झाला. माझ्या आयुष्यात मी त्याची खेळी मनसोक्त पाहू शकलो, ती २४ वर्ष मला
अनुभवता आली, देवाला खेळताना पाहू शकलो. त्याचं स्पीच ऐकून रडलो, जो माणूस २४ वर्ष
बोलला नाही तो त्या दिवशी सगळं मनातलं बोलला. त्याचे आभार आपण काय मानणार ? परवा
हाय वे वर एक वाक्य वाचलं.
“Here’s to the MAN whose
LEGACY will NEVER RETIRE”
हेच खूप समर्पक आहे, अजून
काय म्हणू या विषयावर? सचिन आपल्या मनातून कधीच पुसटसा पण कमी होऊ शकत नाही. THANK YOU SACHIN SIR……..
संगीत आणि कला क्षेत्रातील
काही दिग्गज मंडळींनी यावर्षी आपला निरोप घेतला. त्यातले काही जण फारच चटका लाऊन जाणारे
होते.
राजीव पाटील – सुधीर भट – विनय आपटे – मन्ना डे......आणि....
या सर्वांना आदरपूर्वक
प्रणाम. त्यांचं कार्य सदैव स्मरणात राहील.
पर्सनली संगीत
क्षेत्रातल्या खूप छान लोकांबरोबर यंदा काम करायची संधी मला मिळाली. अनेक संगीतकार,
माझ्या बरोबरीचे गायक कलाकार, वादक कलाकार आणि बरेच कलाकार मित्र या वर्षात भेटले,
त्यांच्या सोबत काम करता आलं.
निश एन्टरटेनमेंट या लाडक्या
संस्थेतले २ नवीन कार्यक्रम या वर्षी मिळाले,
“100 YEARS OF BOLLYWOOD” आणि “PANCHAM – THE IMMORTAL NOTE”
यापैकी “पंचम” चा विशेष
आनंद झाला कारण, पंचमदा आणि त्यांचं संगीत याविषयी नेहेमीच कुतूहल होतं आता त्यांना
समर्पित केलेला कार्यक्रम जगता येतो हे भाग्यच म्हणायला हवं.
या वर्षी अजून एक खूप मोठी
गोष्ट घडली ते म्हणजे आमचं मुंबईत स्वतःचं घर झालं. २०१३ हे वर्ष या कारणासाठी पण
नेहेमीच लक्षात राहील. बुजुर्गांचे आशीर्वाद आणि मित्र परिवाराचं प्रेम याला
कारणीभूत ठरले.
एकंदर हे वर्ष कसं गेलं ते
कळलं नाही. पण या वर्षाने, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. सकारात्मकता दिली. आता
पुढच्या वर्षी अजून चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतील – छान माणसं भेटतील – सगळं शुभ
घडेल अशी आशा करुया.....आणि सरत्या वर्षाला सलाम करूयात......तुम्हा सर्वांना पण
येणारं वर्ष मस्त जावो.....

टिप्पण्या