आरोग्यम धन संपदा !!!!!


आपल्याकडे चांगले आरोग्य नसेल तर आपण करत असलेल्या मेहेनतीचा काय फायदा? 

आपली बायका-मुलांना एक चांगलं भविष्य द्यायचं असेल तर, फक्त मेहेनत आणि काम करून चालणार नाहीये, तब्येतीकडे लक्ष दिलंच पाहिजे. आणि वेळोवेळी टेस्ट्स करून व्यवस्थित उपचार करून घेतले पाहिजेत. 

आपल्या समाजात, आपल्याला असलेल्या एखाद्या शारीरिक आजाराबद्दल "लाज वाटणे" हा खूप कॉमन विषय असतो. आजकाल तरुण मुलामुलींना बी पी, शुगर, स्पॉण्डिलायटिस वगैरे आजार जडू लागलेत, कारण बैठी जीवनशैली, व्यायामाचा आळस, चुकीचे खानपान आणि झोप नीट न घेणे. 

आपण म्हणतो की सध्या भारतात तरुण लोकसंख्या जास्त आहे, पण त्याचप्रमाणे हृदयविकाराने अकस्मात जाणाऱ्यांमध्ये पण दुर्दैवाने तरुणचं आहेत. हे भीषण आहे. 

 आम्हा कलाकारांमध्ये तर ह्या गोष्टीचा फारच विदारक अनुभव दर काही महिन्यांनी समोर येत असतो. आणि मनात विचार येतो की करायचं काय?


सामान्यतः कलाकारांमध्ये २-३ प्रकार आहेत. गायक, वादक, अभिनेते - अभिनेत्री वगैरे.
सगळ्यांना आपापल्या कामात प्रचंड स्ट्रेस असतो. पण माझ्या पाहण्यात सर्वात जास्त स्ट्रेस हा वादकांना होतो, याचं  कारण म्हणजे सततचा प्रवास, खूप वेळ काम सुरु राहणे, वाद्य वाजवणे (हे शारीरिक आणि मानसिक रित्या खूप जिकिरीचं असतं) आणि सामान उचलणे (खास करून वाद्ये )

वादक कलाकारांना मागणी खूप असते पण त्यांना मिळणारे मानधन हे खूप ग्रेट नसल्याने त्यांना जास्त काम घेऊन त्यांचे हिशेब करावे लागतात. या सगळ्यात प्रवासाचे नियोजन नीट झाले नाही तरी ताण येतोच.

Performance Anxiety सुद्धा स्ट्रेस वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. जेव्हा सुट्टी असते तेव्हा हे वादक मित्र आराम करण्याऐवजी नवीन कार्यक्रमातील गाणी बसवत असतात. सतत मेहेनत सुरु.

शरीराला आणि मेंदूला आराम नाही. त्यामुळे या ताणाचे वाईट परिणाम शरीरावर होतात. त्यात पैश्याकडे बघून मेडिकल टेस्ट ना बगल दिली जाते, "मला काही होत नाही" हि एक समजूत असतेच.

एक दिवस पहाड कोसळतो, त्या दिवशी, ना पैसे असतात, ना कुटुंबाकडे उत्तरे !!!!
यावर उपाय एकच

कलाकारांनी

काळजी घेणे, प्रवासाचे नियोजन करणे, २ कार्यक्रमात ब्रेकचं नियोजन करणे, वेळेत "घरचे" जेवणे (वेळ  पडल्यास घरून डबे घ्या सोबत)  व्यसने कमी करणे, चांगली झोप मिळेल तेव्हा घेणे.....

आणि अनेक गोष्टी आहेत.

कुटुंबीयांनी

तो मेहेनत करणारा आपला माणूस हे करत असताना तो कितीही dominating  किंवा egoistic  असला तरी त्याला अडवणे. त्याच्याकडे लक्ष देणे. हे केलेच पाहिजे

नाहीतर आपण फक्त गमावू शकतो आपल्या माणसाला.

हे मी जे लिहिलं ते माझ्यासकट सगळ्या कलाकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लागू पडतं.
आपणच काळजी घ्यायला हवी.  



सर सलामत तो पगडी पचास !!!!! हेच खरंय  !!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन