सलाम किशोरदा !!!!!!
किशोर कुमार - या नावात कसली उर्जा भरलीये !!!!!! त्यांचं गाणं लागलं ना की थांबतो आपण एक क्षण आणि मन घुटमळतं स्वतःशी....त्यांच्या आवाजापाशी.....कसला गोड आवाज??? - कधी मस्तीखोर - कधी करुण - कधी खटयाळ - कधी गंभीर, कित्ती शेड्स असाव्यात एका आवाजाला ?
प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देऊन जातात त्यांची गाणी. मन भरतच नाही. ऐकताना, गाताना, गुणगुणताना. एखादा माणूस आणि त्याचा आवाज इतका कसा भरून राहू शकतो तो हयात नसताना ? अजब आहे !!!!!
किशोरदा म्हणजे एक भन्नाट व्यक्तिमत्व - त्यांच्या बद्दल वाचावं तेवढं कमी -
आणि ऐकावं तेवढं अजब !!!! "कलंदर किशोरकुमार" हे पुस्तक वाचनात आलं आणि या माणसाची कथा समजली. वाचून थक्क व्हायला होतं. रेडीओ वर अन्नू कपूर यांच्या 'सुहाना सफर' मध्ये रोज एक किस्सा किशोर कुमार यांचा असतो. ते ऐकून तर अजूनच कुतूहल निर्माण होतं.
स्वत:च्या आयुष्यात खूप तणाव असूनही - माईक वर गेल्यावरती एका अतिशय वेगळ्या रूपात जगासमोर यायचं म्हणजे दैवी शक्तीच असली पाहिजे. किशोरकुमार एकदाच होतो जगात. पुन्हा होणे नाही. याची खात्री पटते.
त्यांचं गाणं म्हणजे सळसळते चैतन्य. मला नेहमी खूप आनंद होतो, स्टेज वर त्यांचं गाणं सादर करायची संधी मिळाली की. तुम्ही एक प्रकारे जगायला शिकता. सगळे पाश झुगारून स्वत:ला कसं झोकून द्यायचं आणि समोरच्याला निस्सीम आनंद द्यायचा......हे खूप मोठं काम आहे. इतकी गाणी गाऊन - इतकी वर्ष हे सगळं जिवंत ठेवायचं स्वत: पश्चात - हा करिष्मा आहे.
अनेक गोष्टी येतायत मनात किशोरदांच्या गाण्याबद्दल, त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे - He Was A Perfect Screen Singer - स्क्रीन वर, जो हिरो दिसणार आहे, त्याला मनात ठेवून - तो कसा गाईल तसच गायचं. हा एक फार मोठा गुण होता त्यांचा.......अमिताभ असो वा राजेश खन्ना वा ऋषी कपूर, गाणं चपखल बसायचं त्या अभिनेत्यावर......ही न्यारी किमया अनुभवता येते हो, कुठलंही गाणं उचलून पहा त्यांचं.
Expressions - व्यक्त कशी करावीत सुरात - याची University आहेत हे, मग ते "पल पल दिल के पास" असो की "वोह शाम कुछ अजीब थी" - किंवा "ये जवानी है दिवानी....."
मन भरतच नाही....काश ते असताना जन्मलो असतो तर त्यांना लाइव ऐकता आलं असतं, कदाचित त्यांचे आशीर्वाद घेता आले असते.......पण असो.....ते आहेत इथेच - गेलेत कुठे......प्रत्येकाच्या मनात गुंजत असतो त्यांचा आवाज.......
किशोरदा - तुम्ही जो आनंद दिलाय ना जगाला, तो अविस्मरणीय आहे. तुमच्या आवाजाचा गंध चिरंतन दरवळत राहो या आसमंतात !!!!!
सलाम किशोरदा !!!!!

टिप्पण्या