दिवाळी पहाट - एक सुरेल संस्कृती......
दरवर्षी आपण सगळेच ज्या सणाची अगदी उत्सुकतेने वाट पाहत असतो ना, तो सण म्हणजे "दिवाळी".....अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये एक उत्साह आणि आनंद निर्माण होतो.....हे दरवर्षी जाणवतं. आम्हा कलाकार मंडळींमध्ये ही दिवाळीची खास उत्सुकता असते ती अजून एका कारणासाठी म्हणजे, "दिवाळी पहाट".
दिवाळीच्या मंगल पहाटे, सगळे जण, नटून, सजून, फराळ करून किंवा बरोबर घेऊन, आपल्या जवळच्या नाट्यगृहात वा कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन - सुंदर संगीताची अनुभूती घेताना दिसतात. मनाला इतकं छान वाटतं की या सगळ्या मंडळींच्या घटकेभरच्या आनंदोत्सवात आम्ही सगळे कलाकार सामील होऊन त्यांचं मनोभावे मनोरंजन करू शकतो. केवढी मोठी गोष्ट आहे ही....एरवी सुद्धा कार्यक्रमातून गाताना मला लोकांच्या आवडीची गाणी सादर करताना, एक आनंद असतोच. दर्दी प्रेक्षक त्यांचं आवडतं गाणं आलं की, बेभान होऊन ते गाणं आमच्या सोबत गुणगुणतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मनातलं समाधान त्यांच्या टाळ्या बनून आमच्या पर्यंत पोहोचतं.
दाद मिळते तेव्हा खूप छान वाटतं. आणि समोरचा रसिक प्रेक्षक आपलं गाणं किती मनापासून ऐकतोय याची ही प्रचीती येते. तर दिवाळी पहाट ही संकल्पना ज्यांनी सुरु केली त्यांचे प्रथमत: मी आभार मानतो. आता मुंबई, पुणे, नगर, औरंगाबाद, नांदेड, नागपूर इतकच कशाला तर दुबई, अबुधाबी, अगदी अमेरिकेत सुद्धा पहाटेचे कार्यक्रम होताना दिसतात तेव्हा खूप छान वाटतं.
यंदा मला २ पहाटेच्या कार्यक्रमात गायचा मान आणि संधी मिळाली. आपल्या मराठी संगीत क्षेत्रातले २ आघाडीचे संगीत संयोजक आणि संगीतकार - अविनाश चंद्रचूड आणि कमलेश भडकमकर यांनी ती मला मिळवून दिली. अतिशय अभ्यासू आणि Dedicated Musicians हीच त्यांची खरी ओळख सांगता येईल. माझं भाग्य की त्यांनी मला संधी दिली, २ अश्या कार्यक्रमात गायची ज्यातून मला लोकांचं अमाप प्रेम, कौतुक आणि आशीर्वाद मिळाले. दर वर्षी, मला दिवाळी पहाट करण्याचा योग देव कृपेने येतो, याचा खूप आनंद आहे.
मागील वर्षी पिंपरी येथील श्री. राजू मिसाळ यांची दिवाळी पहाट विशेष लक्षात राहिली ती त्यांनी आम्हा सर्व कलाकारांना दिलेल्या विठ्ठल मूर्तीमुळे.
थेट पांडूरंगानेच आशीर्वाद दिला असं वाटून गेलं.
२-३ वर्षांपूर्वी, कै. श्रीमती. स्मिता तळवलकर यांच्या सोबत दिवाळी पहाट करण्याचा योग जुळून आला होता.
या वर्षीच स्मिता ताई आपल्यातून गेल्या, तेव्हा खूप प्रकर्षाने मला त्या कार्यक्रमांची आठवण झाली. आयुष्यातल्या सर्व संकटांवर मात करून लढणारी एक स्त्री पहिली. त्यांचे अनुभव कार्यक्रमात ऐकताना अक्षरश: उर भरून आला होता. पुन्हा या वर्षीच, मुलुंडच्या नाट्य परिषद शाखेच्या उद्घाटनाच्या दिवशी त्या भेटल्या आणि आमच्यात जो शेवटचा संवाद झाला, त्यातही आठवणी निघाल्या.
हे सर्व नमूद करण्याचं कारण की दिवाळी पहाट आम्हा कलाकारांसाठी खूप काही घेऊन येणारा एक सांगीतिक सोहळा असतो. लोकांचं मनोरंजन करण्यासोबतच प्रत्येक कार्यक्रम खूप काही देऊन जातो.
याच वरील सांगितलेल्या कार्यक्रमात, श्री. शरद पोंक्षे यांचा ही सहभाग होता. त्यांचं व्यक्तिमत्व काय सांगू? इतका जबरदस्त माणूस मी पहिला नाही.
अत्यंत तेजस्वी. परखड तरीही मितभाषी. अत्यंत हुशार. मिश्कील अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांनी माझं गाणं ऐकून पाठीवरती दिलेली थाप अजून आठवतेय. अजूनही भेटले की छान बोलतात. अशी मोठी माणसं, या संगीत कलेमुळे मला भेटतात आणि माझा अनुभव समृद्ध करतात याचं खूप अप्रूप आहे मला.
दिवाळीच्या या मंगल समयी, आपण सगळ्यांनी ही परंपरा अशीच कायम ठेवली पाहीजे. आपल्या पुढच्या पिढ्यांनी या परंपरेचा सोनेरी अनुभव घेतला पाहिजे. ही संस्कृती आणि परंपरा अशीच वृद्धिंगत करत राहणाऱ्या सर्व संस्था, मंडळे, आणि व्यवस्थापकांचे मनापासून आभार. सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार.

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.......

टिप्पण्या