अनुभव कार्टून विश्वातला !!!!!
बरेच दिवसांनी आज काहीतरी
लिहावं असं वाटतंय. “बोलके सूर” हा माझा ब्लॉग सुरु तर केला मी, पण सातत्य राखू
शकलो नाही लिहिण्यात. मधल्या काळात इतक्या घडामोडी घडल्या की, साधी आठवण सुद्धा
राहिली नाही ब्लॉग लिहिण्याची. काल एका बुक स्टॉल वर “सप्तसूर माझे” हे अशोक पत्की
काकांचं आत्मचरित्र दिसलं, त्वरित विकत घेतलं आणि क्षणार्धात पहिली ३० पानं वाचून
झाली पण. ती वाचताना मनात आलं की आपण या संगीत क्षेत्रात काम करत असताना येणारे अनमोल
अनुभव कुठे तरी जतन करून ठेवायला हवेत, आपल्या उत्तर काळात या आठवणी आपल्या
चांगल्या सोबती ठरू शकतील, आणि हा काळ सरला तरी याचं अस्तित्व या आठवणींच्या रूपात
साठून राहील. ही प्रेरणा घेऊन पुन्हा बोलके सूर ची नवीन इनिंग सुरु करतोय.
आजचा अनुभव अप्रतिम तर आहेच
पण माझ्यासारख्या गायक कलाकाराला खूप काही देऊन जाणारा आहे. निमित्त Disney चा एक Animation
पट, ज्याचं हिंदी भाषांतर केलेला चित्रपट. ज्यात
गाणी सुद्धा आहेत जी हिंदी मध्ये डब करायची होती. चित्रपटाचं नाव आहे – “Lucky Duck”
कथा एका अशा बदकाची जो
रीजेक्टेड असतो, म्हणजेच नाकारलं गेलेलं एक खेळणं. त्याच्या आयुष्याचा प्रवास
नकारापासून ते त्याला त्याचा मालक आणि त्याचं नवं घर मिळेपर्यंतचा. एकंदर आयुष्यात
आपण किती Optimistic राहिलं पाहिजे हा मेसेज देणारी ही कथा.
आदित्य सोरप चा फोन आला आणि
तो म्हणाला की, या प्रोजेक्ट ची गाणी Conduct करशील का ? ही नवी जबाबदारी
पेलण्याची खूप उत्सुकता वाटली आणि मी लगेचच हो म्हटलं. या आधी, १-२ वेळा कुठली
कुठली गाणी मित्रांसाठी रेकॉर्ड करून घेतली होती, पण ही मोठी जबाबदारी होती. हे Studio ला गेल्यावर लक्षात
आलं.
संगीत क्षेत्राच्या अनेक Branches असतात, त्यातलीच ही एक सर्वात महत्वाची. गाणं
जन्मल्यानंतर ते गायकांकडून गाऊन घ्यायचं अशा पद्धतीने की, त्याचा हवा असलेला
परिणाम साधता आला पाहजे. आता आपली भारतीय संगीतातली गाणी आणि Western Music यात खूप फरक आहे. ताल – सुरांचा लगाव हे तर आहेच पण, या भाषांतराच्या
प्रकारात LIP SYNC तंतोतंत जुळवण्या
करिता विशिष्ट पद्धतीने ही गाणी गाऊन घेण्याची गरज होती हे माझ्या आणि आदित्यच्या
लक्षात आलं.
लहान असल्यापासून Tales Spin, Duck Tales, Donald Duck, Mickey And
Friends अशा एकाहून एक सरस Cartoon Films पहिल्यायेत, त्याची गाणी अजूनही लक्षात राहतील इतकी जबरदस्त होती. त्यामुळे
लकी डक ची गाणी अप्रतिम आहेतच. आमचा गुणी गीतकार अभिषेक खणकर याने नावाप्रमाणेच
खणखणीत हिंदी मध्ये ती लिहिलीयेत सुद्धा. त्यामुळे अर्ध काम सोप्पं झालं.
गायकांची
निवड हा पुढचा विषय होता. तो मी आणि आदित्यने सोडवला. अक्षता सावंत, सुहास सावंत,
विवेक नाईक, रोलँड आणि मी ही गाणी गायची असं ठरलं. एकूण ६ गाणी होती. कोणत्या
पात्रासाठी कोणी गायचं हे ही आम्ही ठरवलं. त्या बाबतीत Disney कडून Approvals घेतली. रेकॉर्डिंग चा दिवस
आला. एकेक करून गायक येत होते आणि आम्ही गाणी रेकॉर्ड करत होतो. अतिशय Flexible अशा हिंदी भाषेमुळे
ही गाणी मुळातच इथे बनलेली आहेत असंच वाटत होतं.
Hollywood मध्ये बनणाऱ्या संगीताची महती काय सांगावी? ती
फक्त अनुभवावी, कुठेच स्वत:ला न अडवता मुक्तपणे झोकून द्यायची वृत्ती, जेव्हा
तुमच्या मुक्त विचारांमुळे, तुमच्या कामात उतरते, तेव्हा रसिकांना काही वेगळीच
पर्वणी मिळते अनुभवायला. ही गाणी हिंदीत करता करता आम्हीच रसिक होऊन गेलो होतो.
प्रत्येक गायकाने मला पूर्ण सहकार्य देऊन पात्रांना हवं तसंच Expression दिल्याने, गाणी बहारदार झालीयेत. अर्थात श्रोतेच या बाबतीत
निर्णय देतील.
अनुभव खुपच शिकवून जातात. हा
एक अत्यंत महत्वाचा अनुभव मला मिळाला याचं श्रेय आदित्यला, त्याने अगदी बिन-दिक्कत
ही जबाबदारी टाकली माझ्यावर. मला आनंद आहे की मी ज्या क्षेत्रात काम करतोय तिथे
मला अनमोल अनुभव आणि उत्तम आनंद मिळतोय. भाग्य यालाच तर म्हणतात......नाही का?

टिप्पण्या
Keep it up !!!
My warm Blessings are always with you.
Vikas Kaka
This gives me a push and a Headstart to start blogging soon...about food, music, recipes, health and much more!
Keep it up... Wish you many more such opportunities !!