सुरेल आशीर्वाद !!!!!!!!
लहानपणी बाबांनी मला एक कॅसेट आणून दिली, आणि म्हणाले, "बेटा ही ऐक आणि यातली गाणी बसव, तुला असं गाता आलं पाहिजे." कॅसेटचं नाव होतं - "सांज होता सखे"
गायक - सुरेश वाडकर
गीतकार - सौमित्र आणि
संगीतकार - अशोक पत्की..........
तेव्हा कळायचं काहीच नाही, पण कॅसेट ऐकली - वारंवार ऐकली, त्यातली गाणी आवडू लागली. सुरेशजींचे दैवी सूर, कवी सौमित्र यांची नितांत सुंदर शब्द योजना आणि पत्की काकांचं अलवार संगीत, असा सुरेख साज होता सगळा. मोठं होता होता कळू लागले या कॅसेट मधील गाण्यांचे अर्थ, त्या शब्दांना दिलेला पुरेपूर सांगीतिक न्याय. ती गाणी गायला लागलो तेव्हा ही मनाला खूप भिडल्या त्या चाली.
हळू हळू अशोक पत्की या नावाची सांगीतिक जादू अनुभवत गेलो, आणि उराशी स्वप्न बाळगू लागलो की एक दिवस, पत्की काकांकडे गायला मिळू दे रे देवा......प्रबळ इच्छा.......
गाणं शिकत असताना पत्की काकांच्या खूप चाली आमच्या गुरुजींनी शिकवल्या, त्या कार्यक्रमात सुद्धा सादर व्हायच्या, पण स्वप्न सत्यात उतरायला अजून बराच काळ जावा लागणार होता.
कॉलेज नंतर, नोकरीच्या निमित्ताने दुबईला गेलो, आणि ५ वर्षांच्या नोकरीनंतर मुंबईत गायक म्हणून खटपट सुरु केली. स्वप्न उराशी बाळगून होतोच अनेक वर्ष, पण नवीन वाट खडतर होती......एकेक करत करत ३ वर्षे प्रवास झाला आणि एक दिवशी अचानक एक फोन आला.
डिस्प्ले वर अक्षरे झळकली - "ASHOK PATKI CALLING"
एक क्षण विश्वासच बसला नाही, माझा स्वतःच्या नजरेवर; घाबरतच फोन घेतला. पलीकडून पत्की काका म्हणाले, "जयदीप ना ? - अरे एका चित्रपटाचं गाणं तुझ्या आवाजात ट्राय करायचं आहे, उद्या वेळ आहे का तुला? "
मी घाई घाईने "हो" म्हणून टाकलं, केवढी मोठी संधी ? बापरे........
पत्की काका म्हणाले - "बरं, मग उद्या ये आजीवासनला तिथे बघूया आपण ते गाणं तुझ्या आवाजात"
फोन बंद झाला, आणि मी थेट देवापुढे जाऊन त्याला "Thank You" म्हणालो. त्यानेच माझ्यासाठी ही एवढी सोनेरी संधी आणून दिली होती....लागलीच ही बातमी पहिले आईला फोन करून सांगितली. ती ही खूप खुश झाली. दुसऱ्या दिवशी, आजीवासन स्टुडीओ मध्ये पोचलो ठरलेल्या वेळी, पत्की काका तिथे आधीच काम करत होते. मला पाहून छान हसले. मी पहिल्यांदाच भेटत होतो त्यांना. पहिले वाकून नमस्कार केला, भरून पावलो, इतकं गोड व्यक्तिमत्व आहे ना, की सांगता येणार नाही. त्यांना भेटलो की मला एकंच म्हण आठवते,
"कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी"
अगदी असेच दिसतात पत्की काका, छान स्मित हास्य करून ते मला रिहर्सल रूम मध्ये घेऊन गेले, पेटी घेतली, मला म्हणाले, "किती वरपर्यंत जातो तुझा आवाज, काय पट्टी मध्ये गातोस तू ? " मी उत्तरलो, तसं त्यांनी मला चाल ऐकवली त्यांच्या नवीन गाण्याची, गाणं सुफी होतं, फिल्मचं नाव "कुणासाठी कुणीतरी", गाणं २-३ वेळा ऐकवल्यानंतर म्हणाले, "गा आता माझ्या मागून", मी गायलो. त्यांना हव्या असलेल्या पट्टी मध्ये माझा आवाज नीट मोकळा लागत होता हे पाहून त्यांना चांगलं वाटलं. त्यांनी मला गाण्याचा कागद सोपवला आणि म्हणाले, "तुला मोबाईल वरती याची चाल देतो - घरी तयारी कर आणि २ दिवसांनी रेकॉर्डिंग करुया" - झालं, मी हतबुद्ध. त्यांच्या असीस्टंट कडून गाणं घेऊन घरी आलो. २ दिवस घासून पुसून गाणं तयार केलं आणि रेकॉर्डिंग चा दिवस उगवला.
माईक वर गात असताना काका मला वेगवेगळ्या सूचना करत होते. त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतलं आणि ते गाणं अप्रतिम झालं. मला कितपत चांगलं गाता आलंय, हे मी ठरवू शकत नाही, पण पत्की काकांसाठी पहिलं गाणं गायल्याचा जो काही आनंद होता, तो असा शब्दात सांगता येणार नाही.
त्यांची प्रेमळ थाप पाठीवर पडली, आणि माझ्या पुढील सांगीतिक प्रवासाला उत्तम आशीर्वाद मिळाला. त्यानंतर काकांकडे ७ ते ८ गाणी अजून गायचा योग आला. आशीर्वादच त्यांचा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आपोआपच खूप गोष्टी शिकता येतात, त्यांचा दांडगा अनुभव आपल्याला खूप काही समजावून जातो. आपण नकळत प्रगल्भ होत जातो. अजून एक विलक्षण गोष्ट काकांबद्दल सांगायची म्हणजे, ते अगदी चुटकी सरशी चाल लावतात. त्यांचा स्पीड भयानक आहे, १५ मिनटात अख्खं गाणं तयार झालं पाहिजे असा एक दंडक असतो त्यांचा स्वत:लाच. विलक्षण आहे त्यांचा मेंदू. इतका तल्लख की चाट पडतो आपण.
मध्यंतरी, एका पुस्तक प्रदर्शनात हिंडत असताना - "सप्तसूर माझे" असं पुस्तक दिसलं, आणि पत्की काकांचं, सुरेल स्मित असलेलं मुखपृष्ठ होतं त्या पुस्तकाला - लागलीच मी ते घेतलं आणि झपाट्याने वाचून काढलं. थक्क झालो मी, त्यांच्या अनुभव विश्वातल्या गोष्टी वाचून. त्यांच्या बद्दल, त्यांनीच सांगितलेल्या, आजवरच्या त्यांच्या वाटचालीचा लेखाजोखा होता ह्या पुस्तकात. त्यातून सुद्धा खूप काही शिकलो. कसल्याही फळाची अपेक्षा न करता , फक्त आपलं काम चोख करत राहणे, अशी मोलाची शिकवण मला मिळाली.
पुस्तक वाचून २-३ महिने झाले आणि परवा २४ डिसेंबर २०१४ ला पत्की काकांचा फोन आला. एका रेकॉर्डिंग साठी. पुन्हा त्यांची भेट होणार म्हणून खूप खूप आनंद झाला. मी रेकॉर्डिंग साठी गेलो, काका आले. अत्यंत उत्साहाने त्यांनी माझी विचारपूस केली, मला चाल शिकवली आणि आम्ही गाणं रेकॉर्ड केलं. ७४ वर्षे वय असताना इतका उत्साह आणि एनर्जी ते कुठून आणत असतील याचाच विचार मी करत होतो. त्यांचं आत्मचरित्र वाचल्याचं त्यांना सांगितलं, आणि त्यांच्याच पुस्तकावर मी सही मागितली त्यांची. अगदी नि:संकोच त्यांनी मला एक मेसेज लिहून सही करून दिली. अतिशय साधेपणाने आणि चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य ठेऊन अविरत काम करणारे पत्की काका, माझ्याशी बोलत बसले आहेत, हे दृश्य कधीच न विसरण्याजोगं आहे माझ्यासाठी.

गायक म्हणून माझा सर्वोच्च मान झाला, पत्की काकांनी मला संधी दिल्यामुळे. हे मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांचे आणि देवाचे खूप आभार या अनमोल संधीकरीता. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. अजून खूप काम करायचं आहे त्यांच्यासोबत. जितकं करू तितकं कमी - इतकं मोठं विद्यापीठ आहे, पत्की काका म्हणजे, आम्हा सर्व आजच्या कलाकारांसाठी.
प्रिय बाबा - हा फोटो खास तुमच्यासाठी. गायक म्हणून खूप काही शिकायचंय मला अजून, "सांज होता सखे" मध्ये सुरेशजी गायलेत, तिथवर मी अजून पोहोचू शकलेलो नाहीये, पण पत्की काकांचा परीस-स्पर्श लाभलाय मला. तुमच्याच आशीर्वादाने. हा आशीर्वाद सतत मिळत राहूदेत.......तुमच्या इच्छा माझ्याकरवी पूर्णत्वाला जावोत हीच मनोकामना.......

टिप्पण्या
May God bless him with lot of healthy and bright years ahead 🙏