आठवणी अमेरिकेच्या......भाग २ - एक हळवी पण प्रेरणादायी आठवण.
एक हळवी पण प्रेरणादायी आठवण.......
आज मी तुमची कुणाशी तरी ओळख करून देणार आहे. या जगात किती लोक, कितीतरी वेगवेगळी समाजोपयोगी कामे करून सोशल सर्विस करत असतात. आपल्याला माहित सुद्धा नसतं बरेचदा. पण या लोकांना जवळून पाहिल्यावर कल्पना येते. त्यांचे उदात्त विचार आणि आपण समाजाला काहीतरी देणं लागतो ही भावना आपल्यात जागृत करते त्यांची उर्जा.
मी बोलतोय न्यू जर्सीच्या श्री. महेश आणि मनीषा लाड यांच्याबद्दल. "Akhil Autism Foundation" ही आॅटीझम या आजार असणाऱ्या मुलामुलींसाठी, सेवाभावी काम करणारी एक अग्रगण्य संस्था, हे दाम्पत्य चालवते. खूप अभिमान वाटतो मला की, ही आपलीच मराठी माणसं परदेशात राहून इतकं मोठं सामाजिक काम
हातात घेऊन कर्तृत्व गाजवताहेत.
निमित्त हे की "कौशलकट्टा" हा कार्यक्रम संपूर्ण अमेरिकेत करण्याचा उद्देश म्हणजे "Akhil Autism Foundation" या संस्थेचा प्रचार करणे आणि लोकांना या संस्थेबद्दल जागृत करणे. आणि योगायोगाने, मी महेश आणि मनीषा यांच्याच घरी राहिलो बरेच दिवस. आणि मी जे पाहिलं त्याने मी आतून हललो.
महेश आणि मनीषा यांचा गोड मुलगा अखिल - त्याला भेटून खूप आनंद झाला. अखिल स्वत: या आजाराने लहानपणीपासून ग्रासलेला आहे. आज तो १३ वर्षांचा आहे. त्याच्या आईने त्याला लहान असल्यापासून खूप छान वाढवलं आहे. त्या माउलीला जेव्हा त्याच्या या आजाराची चाहूल लागली, तेव्हा तिने अत्यंत धीराने, आपलं पर्सनल करिअर सोडून, संपूर्ण वेळ आपल्या मुलासाठी दिला. बाबा महेश लाड, खूप मेहेनतीने काम करतच होते. पण आईने संपूर्ण लक्ष अखिल वर केंद्रित केलं.
Autistic मुलांच्या ब्रेन चा विकास त्यांच्या वयाप्रमाणे जरी होत असला तरी, त्याचं शरीर आणि मेंदू यांतील समन्वय विपरीत असल्याने, त्यांच्यासोबत खूप वेगळ्या पद्धतीने Exercises करावे लागतात.
मनीषाचं काम पाहून मी केवळ थक्क झालो. तिने मला अखिल चे लहानपणापासूनचे वीडीओज दाखवले. त्यातून मला समजत गेलं की कश्या प्रकारे अखिलने प्रगती केली आहे, त्याच्या आजवरच्या आयुष्यात.
अखिल बद्दल बोलायचं तर - तो इतका प्रखर बुद्धिमत्ता असलेला मुलगा आहे की, आपल्यासारख्या सामान्य माणसांपेक्षा कितीतरी पटीने तल्लख विचार तो करू शकतो. याचा प्रत्यय मला आला जेव्हा मी त्याच्यासाठी एक गाणं गायलो. त्याने गाणं ऐकलं, आणि त्याच्या आय पॅड वरती टाईप केलं,
"जयदीप दादा तू खूप हृदयापासून गातोस आणि तुझ्या बाबांचं स्वप्न तू नक्की पूर्ण करशील. "
माझे डोळे भरून आले. मनीषा सोबत माझी गोष्ट शेअर करताना अखिलने ती ऐकली होती. आणि गाण्यावर बोलताना तो सहज त्याच्या मनातलं बोलून गेला. असा अनुभव घेतल्यानंतर शब्द उरत नाहीत काहीच.
"Akhil Autism Foundation" अविरत काम करत असतं या मुलांच्या उन्नतीसाठी. त्यांना समाजात एक भक्कम स्थान मिळवून देण्यासाठी. आपल्या पायावर ही मुलं मोठी झाल्यावर उभी कशी राहू शकतील यासाठी संस्थेची सगळी धडपड सुरु असते. मनीषा हे सगळं काम करण्यासाठी खूप ठिकाणी फिरत असते. ती अखिल ला घेऊन अनेक Conferences ला जाणे, अनेक लोकांशी चर्चा करणे. अखिल च्या शाळेत जाऊन त्याची प्रगती डिस्कस करणे, असे सर्व अगदी नेमाने करते.
हे सगळं करत असताना, आमच्यासारखे लोक जेव्हा दौरा करतात तेव्हा आमच्या जेवणापासून ते राहण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची अगदी जातीने - प्रेमाने स्वत: काळजी घेते. मला तर मी अगदी माझ्याच घरात राहतोय असं वाटत होतं.
महेश लाड - अखीलचे बाबा - एक अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, संगीतप्रेमी, गायनाची आवड परदेशात राहून जोपासणारा एक कलंदर माणूस. आयुष्य एक Challenge आहे आणि ते हसून खिदळून कसं Accept केलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण. Office चं काम सांभाळून, अखिल साठी घरात आणि घराबाहेर खूप काही करताना या संस्थेची पायाभरणी केली महेश आणि मनीषाने. त्यांना असं लक्षात आलं की Traditional उपचार पद्धतीत असलेला तोचतोचपणा आणि उदासीनता यांनी काही घडत नाहीये. आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी या आजारासाठी अमलात आणण्यात येणारी कार्य पद्धती त्यांनी अभ्यासली. अखिल मध्ये घडत जाणारे बदल त्यांनी अनुभवले आणि ठरवलं की हीच सोय इतर मुलांना आणि त्यांच्या पालकांना पण मिळाली पाहिजे.
त्यासाठी ते खूप धडपडले, त्यांनी जीवाचं रान करून संस्था वाढवली. आज अनेक पालक या संस्थेचा आणि त्यांच्या कार्यशाळा - शिबिरं - इत्यादींचा लाभ घेत आहेत. अमेरिकेतील अनेक शाळा मनीषा ला बोलवून तिच्या पद्धती आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमात कश्या आणता येतील, यासाठी पाठपुरावा करत असतात. साहजिकच ही खूप मोठी Achievement आहे, आणि हे सगळं अगदी जवळून पाहायला मिळालं याचं श्रेय आमच्या प्रिय कौशल इनामदार यांना. कौशल दादा आणि आम्ही सर्व जण या मोहिमेत सामील होऊ शकलो हे आमचं भाग्य.
बरेच वेळा आपण फक्त आपल्या गोष्टी, आपली मुलं, आपलं घर हाच विचार करतो. पण जसं जमेल तसं प्रत्येकाने थोडा तरी हातभार लावला पाहिजे सोशली, असं वाटतं. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर आपण शिकत असतो - मनीषा आणि महेश कडून मी जे शिकलो ते अमुल्य आहे. निस्वार्थी होऊन सामाजिक कामात स्वत: ला झोकून देणं त्यांच्याकडून शिकलो.
अखिल मोठा होऊन त्याच्या करिअर मध्ये खूप उंच पातळी नक्कीच गाठेल, हे आत्ताच त्याची प्रगती बघून समजतंय. त्याला असे पालक मिळालेत, असेच पालक सगळ्या मुलामुलींना मिळो आणि समाजात चांगल्या प्रवृत्ती वाढत राहोत हीच श्रीं चरणी प्रार्थना......
मनीषा आणि महेश लाड यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.........
तुम्हीसुद्धा या चळवळीचा भाग बनू शकता खालील वेबसाईट वरती जाऊन या संस्थेबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. आणि थेट मदत सुद्धा करू शकता......
http://www.akhilautismfoundation.org/

![]() |
| अखिल महेश लाड |

टिप्पण्या
अप्रतिम लिहिले आहेस. अखिल ला मी त्याच्या जन्मापासून पाहत आलो आहे आणि महेश-मनिषा यांनी त्याच्यावर जे अफाट कष्ट घेतले आहेत त्याला तोड नाही. आम्ही कलामंच च्या माध्यमातून याचा जेवढा जमेल तेवढा प्रचार आणि मदत करत असतोच पण तुमच्या सारख्या कलाकारांचा - ज्यांचा लोकसंग्रह खूप आहे - अशांतर्फे हे लोकांपर्यंत पोचले, आणि समजले तर या कामाची व्याप्ती वाढते. पुन्हा एकदा धन्यवाद इकडे आल्याबद्दल आणि तुमच्या कलेतर्फे जी मदत केलीत त्या बद्द्ल. चांगल्या कामाचा नेहमी कधी न कधी संपूर्ण पणे वेगळ्या स्वरुपात आयुष्यात चांगला अनुभव येतोच. तुला पण येईलच याची मला खात्री आहे.