कलाकारांचं आर्थिक नियोजन

आम्हा कलाकारांना एक स्पेशल गोष्ट नेहेमी अनुभवायला मिळते - ती  म्हणजे खूप वेगवेगळ्या विषयांचे कार्यक्रम करायला मिळतात. आणि अशा स्पेशल ठिकाणी काही एक्सपर्ट माणसं भेटतात ज्यांचे विचार ऐकून प्रेरणा मिळते. "धन करा रे प्रसन्न" नामक एका कार्यक्रमात मला "आर्थिक गुंतवणूक" या विषयावरचे मोलाचे विचार, काही तज्ञ मंडळींकडून ऐकायला मिळाले. त्यातून मला एक कलाकार म्हणून आर्थिक साक्षरता व आर्थिक गुंतवणूक किती महत्वाची आहे याचा बोध झाला.

कला विश्वात “आर्थिक” असा शब्द म्हटला की खूप चर्चा / वाद / तक्रारी यांना उधाण येतं, आणि कुणालाच त्याबद्दल फार ज्ञान अवगत नसतं, म्हणून मला जे ज्ञान मिळालय ते शेअर करावंसं वाटतंय, आता या विषयात मी काही तज्ज्ञ नाही, पण सामान्य भाषेत व सोप्या शब्दात काही मुद्दे मांडू इच्छितोय.

पहिला मुद्दा - कलाकारांना निवृत्तीवेतन नसतं त्यामुळे त्यांच्या उतरत्या काळात त्यांच्या आर्थिक मदतीसाठी त्यांना स्वतःलाच धडपड करावी लागते. त्यामुळे आत्तापासून म्हणजे कार्यरत असतानाच भविष्याची तरतूद करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. म्हणजे काय ? तर आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक मानधनातून किमान १० % रक्कम बाजूला काढून तिची गुंतवणूक करणे. बचत हल्लीच्या काळात होत नाही कारण गरजा इतक्या वाढल्या आहेत की त्या पुरवतानाच मिळकत संपते. तेव्हा ही १० % रक्कम प्रत्येकाने बाजूला काढलीच पाहिजे, हा शिस्तीचा भाग आहे, आणि एकदा सवय झाली की सहज शक्य पण आहे.




त्यानंतर, सर्वात महत्वाचं म्हणजे LIC Policy किंवा कोणतीही Insurance Policy म्हणजे गुंतवणूक नव्हे. त्या Policies असतील तर तशाच राहूंदेत पण गुंतवणूक करायची असेल तर खालील पर्याय महत्वाचे ठरतात.

१ - शेअर्स 
२ - म्युच्युअल फंड
३ - सोनं
४ - Fixed Diposit
५ - पी पी एफ




आपल्याला लहानपणापासून जर आर्थिक गुंतवणूक या विषयावर काहीही शिकवलं गेलेलं असेल, तर त्यात पर्याय क्रमांक ३,४,५ बद्दलच आपल्याला माहित असतं  इतर पर्याय माहित नसतात किंवा सांगितले गेलेले नसतात.

“सोनं घेऊन ठेवा” असं म्हटलं की आपण सोनं साठवायला लागतो. पण रोजचं वर्तमानपत्र वाचलं की समजतं सोन्याचे भाव खूप वर-खाली होत नाहीत त्यामुळे सोनं खूप परतावा देणारी गुंतवणूक नाहीये पण सोन्याचा खरा उपयोग अडचणीच्या काळात पैसे मिळवून देणारं  उत्तम साधन म्हणून करता येतो. त्यामुळे गरजेपुरतं सोनं जरूर ठेवावं.

शेअर मार्केट म्हणजे "सट्टा" हा आपल्याकडचा सर्वात वाईट गैरसमज आहे. याचं कारण, शेअर्स म्हणजे काय ? शेअर मार्केट मध्ये काय चालतं ? हे आपल्याला माहीतच नाहीये म्हणून ते आपल्याला धोकादायक वगरे वाटतं. पण तसं नाहीये, शेअर्स हा परतावा देणारे उत्तम पर्याय आहेत जर आपण विचारपूर्वक शेअर्स निवडले आणि दर महिन्याला थोडे थोडे घेऊन ठेवून दिले, तर काही वर्षांनी मिळणारा परतावा हा बँकेपेक्षाही जास्त असू शकतो. या विषयावर मी अभ्यास आणि गुंतवणूक सुरु केली आहे. या विषयावरची सविस्तर माहिती पुन्हा केव्हातरी नक्की देईन.

म्युच्युअल फंड हे सर्वात प्रभावी गुंतवणुकीचं माध्यम सध्या उपलब्ध आहे, ज्यात रिस्क कमी आणि परतावा जास्त आहे. फक्त यासाठी कुठला फंड निवडायचा या करता तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा लागतो. आर्थिक नियोजनकार ह्यात आपल्याला मदत करू शकतात. महिन्याला कमीत कमी ५०० रुपयांपासून आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो. आणि सर्वांनी केली पाहिजे. (SIP – Systematic Investment Plan)

या सर्व पर्यायांबद्दल आता internet वर खूप माहितीचे VDO आहेत. ज्यातून सहज आपण माहिती मिळवू शकतो.

म्युच्युअल फंड या विषयावरची ही एक सुंदर फिल्म आहे. ती  वेळ काढून नक्की बघा. इथे लिंक शेअर करत आहे. 


एक म्हण आहे,
"All Eggs Should not be kept in a Single Basket"

म्हणजेच आपली गुंतवणूक करताना विविध पर्याय विचारात घेतले पाहिजेत. म्हणजे आपल्या उत्पन्नाची वाढ होतेच शिवाय नुकसान झालच तरी सगळं एकदम  होत नाही. या सगळ्या गोष्टींवर सविस्तर बोलायचं असेल तर तुम्ही मला भेटू शकता. मला मदत करायला खूप आवडेल. 

पूर्वीच्या काळी कलाकार आपल्या कलाकृतीत रंग भरण्याकरता खूप खर्च करत, वेळप्रसंगी कर्ज घेऊन कलाकृती पूर्णत्वास नेत असत, पण त्यामुळे उतार वयात वैयक्तिक आयुष्यात खूप हलाखीचे दिवस त्यांना पाहावे लागत असायचे. अगदी आत्ता पर्यंत अशा काही ज्येष्ठ कलाकारांची परवड पाहताना त्रास होतो. 

म्हणजे तेव्हा या कलाकारांना मिळालेल्या उत्पन्नातून, दूरदृष्टीने व योग्य जागी गुंतवणूक केली गेली असती तर, आज त्याची फळं त्यांना मिळाली असती. 

दुसर्या बाजूला आज, आपल्या पिढीतले काही नवे कलाकार जेव्हा यशस्वी झाल्यावर, उत्तम प्रकारे गुंतवणूक करून, भविष्याची उत्तम तरतूद करताना दिसतात तेव्हा,  अभिमान वाटतो आणि त्यांच्याकडून शिकून आपणही प्रेरणा घेतली पाहिजे याचं महत्व पटतं.  

थोडक्यात, या सर्व उदाहरणांतून योग्य तो बोध आपण घेतलाच पाहिजे. गुंतवणुकीला पर्याय नाही.  















टिप्पण्या

@Mayur joshi म्हणाले…
गुड़ वन मित्रा ☺��
@Mayur joshi म्हणाले…
गुड़ वन मित्रा ☺��
Swapnil म्हणाले…
Classic one Jaydeep da... Finance baddl agadi sadha sopa lihilays...��
Swapnil म्हणाले…
Classic one Jaydeep da... Finance baddl agadi sadha sopa lihilays...��

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"