“God–Mother”
आज मी " वैशाली सामंत " या माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या "Turning Point" बद्दल बोलणार आहे . मला ठाऊक आहे की तुमच्यापैकी जवळ जवळ सगळ्यांना माझी स्टोरी माहीत असेल . पण नसली तर इथे ती पुन्हा सांगणे क्रमप्राप्त आहे . दुबईत मध्ये २००४ मध्ये मी नोकरी करीता पोहोचलो , २००९ पर्यंत उत्तम नोकरी सुरु होती . एक साधा मराठी मुलगा ते दुबईत स्थायिक मराठी मुलगा इतका प्रवास झालेला होता . तिथे विकेंड ला गाणं सुरु होतच , शास्त्रीय संगीत शिक्षणही सुरु होतं . माझ्या दुबईतल्या जडणघडणीत एक मोठा वाटा दुबई महाराष्ट्र मंडळाचा सुद्धा आहे . २००८ मध्ये मी मंडळाच्या कार्यकारिणीवर होतो आणि खूप छान कार्यक्रम त्यावर्षी आम्ही केले . त्यातलाच शेवटचा होता " वैशाली सामंत कॉन्सर्ट " आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो . नेमका कामानिमित्त बाहेर असल्याने एका महत्वाच्या मीटिंग ला मी नव्हतो तेव्हा एक चर्चा झाली . काही कारणाने वैशाली सोबत येणारा गायक येऊ शक...