केमॉन बोका मोंटा रे......

हल्ली एखादी हिंदी फिल्मच्या गाण्यांची अख्खी सी डी विकत घेण्याचा योग फारच कमी येतो. कारण तसं संगीत बनत नाही आजकाल. काल एक सी डी शेल्फ मधून बघत होती माझ्याकडे, ज्यातली गाणी खूप वेळा मी ऐकली होती आणि आवडली पण होती मला. मी ती सी डी विकत घेतली. “लुटेरा” हल्लीच येऊन  गेलेला एक चित्रपट. सोनाक्षी सिन्हा चा एकमेव मी पाहिलेला आणि मला आवडलेला सिनेमा.
 

 पिरियड फिल्म असल्याने संगीत आव्हानात्मक होतं याचं. पण याची जबाबदारी लीलया पेलली “अमित त्रिवेदी” या आत्ताच्या एका गुणी संगीतकाराने.


Long Drive ला जाताना चांगली सी डी ऐकण्यासारखं सुख नाही. आपण, आणि ते संगीत बस. लुटेरा ची सी डी लावली गाडीत आणि इतकी मजा आली मला ती ऐकताना की भानच राहिलं नाही कधी माझं Destination आलं, आणि एव्हाना मी ४ वेळा ऐकून झाली होती सी डी.

अगदी पहिल्या “सवार लू” पासूनच मनावर मोहिनी घातली सी डी ने. मोनाली ठाकूर चा  फ्रेश आवाज – अमिताभ भट्टाचार्य यांचे अप्रतिम शब्द लाभलेत या अल्बमला, खूप दिवसांनी चांगलं संगीत विथ चांगले शब्द ऐकायला मिळाले.


दुसरं  गाणं “अनकही” – ते पण खूप अप्रतिम झालंय, आणि हे गाणं स्वतः अमिताभ भट्टाचार्य यांनीच गायलंय हे ऐकून अजूनच मस्त वाटलं, खूप छान गायलंय. अर्थ पण सुंदर जमून आलाय.




स्वानंद किरकिरे अमेझिंग लिहितात पण तितकच मूड मध्ये गातात – त्यांचं
केमोन बोका मोंटा रे सही झालंय  - मूड जमवून आणणारी काही गाणी असतात, जी सुरु झाली की तुमच्या चेहऱ्यावर आपसूक हसू येतं, त्यातलं हे गीत.


आणि सर्वात भन्नाट झालेलं गाणं म्हणजे – “मन मर्जीया” – अलीकडच्या काळातलं एक अत्यंत भावपूर्ण आणि तितकच भिडणारं गाणं आहे हे. पहिल्यांदा जेव्हा ऐकलेलं  तेव्हाच खूप Enjoy केलं होतं, अमित त्रिवेदी आणि शिल्पा राव यांनी साकारलय हे गाणं - केवळ अप्रतिम. 



कुठल्याही संगीताची खरी मजा घ्यायची असेल ना तर ओरिजिनल सी डी ऐकलीच पाहिजे. प्रत्येक गाण्यातले संगीतकाराने बांधलेले बारकावे त्यात ऐकायला मिळतात. संगीत संयोजन  कसं करतात – काही विशीष्ट वाद्य का वापरली जातात, ह्या सगळ्याचं उत्तर त्या सी डी च्या क्वालिटी मध्ये दडलेलं असतं. पायरसी मुळे लोकांचं सी डी ऐकणं, हे एम पी ३ पर्यंत मर्यादित राहिलंय. त्यात गाणं ऐकू येतं पण त्याची पुरेपूर गम्मत अनुभवता येत नाही.


लुटेरा ची सी डी सगळ्यांनी विकत घेऊन ऐकली पाहिजे. तुम्हाला माझ्याप्रमाणेच अनुभव येईल आणि काही क्षण का होईना मूड चांगला बनेल यात शंका नाही. आणि मग कदाचित तुमचं ही मत बदलेल की आजकाल सुद्धा चांगलं संगीत बनतय आपण फक्त ते करेक्ट मिडीयम through access केलं पाहिजे.... 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन