“बोलके सूर” - या माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉग वरची ही पहिलीच पोस्ट.....संगीताच्या स्वरमयी प्रवासात रोज येणाऱ्या सुरेल अनुभवांचा ठेवा जतन करून ठेवावा असं वाटून गेलं मनाला. शिक्षणाने इंजिनिअर असूनही सुरांच्या दुनियेतली माझी मुशाफिरी ४ वर्षांपूर्वी सुरु झाली.

या काळात मला खूप गुणी संगीतकार, गीतकार, गायक, गायिका, दिग्दर्शक, लेखक अशी अनेक मंडळी भेटली. त्यांच्याकडून नेहमी काहीतरी शिकावं, असं वाटत राहिलं, या सगळ्या अनुभवातून प्रवास करताना नवनवीन प्रयोगांमध्ये सहभागीही होता आलं, त्यातूनच पार्श्वगायनाची संधी मला मिळत गेली. आणि मग या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गायन प्रकारांशी माझी ओळख होत गेली.

जिंगल्स, नाटकातली गाणी, फिल्म मधली गाणी, अल्बम....आणि आता सिनेमासाठी केलेलं पार्श्वगायन...

येणारा प्रत्येक अनुभव शब्दांकित करण्याचा प्रयत्न आहे.

बोलके सूर – A New Journey Has Begun…….







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन